वर्ल्डकपमध्ये महिला टीम इंडियाला `बाहेरचा रस्ता`

पुरूषांप्रमाणेच महिलाही वर्ल्ड कपवर वर्चस्व कायम ठेवतील अशी आशा असणाऱ्या टीम इंडियांच्या महिलांनी भारतीयांची पार निराशा केली.

Updated: Feb 6, 2013, 08:41 AM IST

www.24taas.com, मुंबई
पुरूषांप्रमाणेच महिलाही वर्ल्ड कपवर वर्चस्व कायम ठेवतील अशी आशा असणाऱ्या टीम इंडियांच्या महिलांनी भारतीयांची पार निराशा केली. मिताली राजच्या नेतृत्वाखाली महिला टीम इंडियांने पहिल्याच फेरीत नांगी टाकली. श्रीलंकेसोबत झालेल्या तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियांच्या महिलांना अपयशच आलं आणि त्यांना घरचा रस्ता पकडावा लागला.
महिला वर्ल्ड कपमधील भारताचं आव्हान लीग राऊंडमध्येच संपुष्टात आलं आहे.
लीग राऊंडमध्ये अखेरच्या मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताचा १३८ रन्सने पराभव झाला. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या लंकेनं भारतासमोर विजयासाठी २८३ रन्सचं विशाल आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताची इनिंग १४४ रन्सवर आटोपली आणि या पराभवाबरोबरच भारताचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं.
श्रीलंकेकडून चार खेळाडूंनी हाफ सेंच्युरी झळकावली. तर सिरिवरदेने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. आता सातव्या आणि आठव्या स्थानासाठी भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होईल. ही लढत कटकमध्ये ७ फेब्रुवारीला खेळवली जाणार आहे.