www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
चँम्पियन्स टीम आता झिम्बाब्वेशी झुंज देण्यास तयार झालीय. यासाठी टीम रविवारी झिम्बाब्वेला रवाना झालीय. परंतु यात कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी असणार नाही, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया झिम्बाब्वेशी मॅच खेळणार आहे. २४ जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच वनडेच्या सिरीजमध्ये टीम इंडियाने भाग घेतलाय. महेंद्रसिग धोनीसोबतच ईशांत शर्मा, भुवनेश्वनर कुमार आणि उमेश यादव यांनाही विश्रांती देण्यात आलीय. भारत तीन वर्षानंतर झिम्बाब्वे दौरा करतोय.
याआधी २०१० मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेमध्ये भारताने ‘ट्राय सिरीज’मध्ये भाग घेतला होता परंतु भारत फायनलमध्ये पोहोचू शकला नव्हता. मात्र त्यानंतर झालेल्या टी२० मध्ये मात्र भारताने झिम्बाब्वेला हरवले होते. त्यावेळी कर्णधार सुरेश रैना होता तर उपकर्णधार विराट कोहली होता. २०१०च्या दौऱ्यात सहभागी असलेले रविंद्र जडेजा, रोहित शर्मा, आणि आर, विनय कुमार आताच्याही सिरीजमध्येही खेळणार आहेत.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठीची भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार),
शिखर धवन,
रोहित शर्मा,
दिनेश कार्तिक,
चेतेश्वर पुजारा,
सुरेश रैना,
अंबाती रायडू,
अजिंक्य रहाणे,
रविंद्र जडेजा,
अमित मिश्रा,
परवेज रसूल,
मोहम्मद समी,
आर विनय कुमार,
जयदेव उनादकट
मोहित शर्मा
झिंब्वांबे दौरा असा असेल
24 जुलै - पहिली वनडे, हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
26 जुलै - दूसरी वनडे: हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
28 जुलै तीसरी वनडे: हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
31 जुलै - चौथी वनडे: क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
३ ऑगस्ट - पाचवी वनडे: क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.