एका बाबतीत कोहलीने टाकले धोनीला मागे

`आयपीएल`च्या लढाईमध्ये विराट कोहलीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. विराटने आता गूगलवर सगळ्यात जास्त वेळा शोधण्यात आलेल्या क्रिकेटरमध्ये धोनीपेक्षा जास्त क्लिक्स मिळवले आहेत. या सर्चिंगमध्ये विराट आता पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

Updated: May 8, 2014, 05:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
`आयपीएल`च्या लढाईमध्ये विराट कोहलीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. विराटने आता गूगलवर सगळ्यात जास्त वेळा शोधण्यात आलेल्या क्रिकेटरमध्ये धोनीपेक्षा जास्त क्लिक्स मिळवले आहेत. या सर्चिंगमध्ये विराट आता पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कॅप्टन असलेल्या विराटला गूगलवर सगळ्यात जास्त वेळा शोधण्यात म्हणजे सर्च करण्यात आलं आहे. यानंतर जास्त सर्च केलेल्या लिस्टमध्ये महेंद्र सिंग धोनीचा दुसरा नंबर लागतोय. `आरसीबी`चा युवराज सिंग या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. `आयपीएल` जेव्हा पासून भारतात आलं आहे. तेव्हा पासून गूगलवर सर्चिंग वाढल्याचं समोर आलंय.
परदेशीय खेळाडूंमध्ये `कोलकत्ता नाईट राईडर्स`च्या क्रिस लीनचं सर्चिंग त्याने पकडलेल्या अजब कॅच प्रमाणेच अजबरित्या वाढलं आहे. कारण क्रिस लीनने डिव्हिलिअर्सचा जो अप्रतिम झेल पकडला. तो झेल पाहण्यासाठीच क्रिस लीनचे क्लिक्स वाढले आहेत. क्रिस लीन या यादीत चौथ्या नंबरवर आहे.
या सर्चिंगमध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे `किंग्स इलेवन पंजाब`चा कोच संजय बांगर याला देखील गूगलवर जास्त शोधण्यात आलं आहे. सगळ्यात जास्त शोधल्या जाणाऱ्या भारतीय कोचमध्ये बांगर हा पहिल्या क्रमांकावर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.