सचिनपेक्षा कोहलीची कामगिरी `विराट` - गांगुली

सचिन तेंडूलकरच्या चाहत्यांना त्याची तुलना कुणाशीही केलेली पचनी पडत नाही पण ही तुलना पुन्हा एकदा झालीय... आणि यावेळी ही तुलना केलीय टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 31, 2013, 03:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सचिन तेंडूलकरच्या चाहत्यांना त्याची तुलना कुणाशीही केलेली पचनी पडत नाही पण ही तुलना पुन्हा एकदा झालीय... आणि यावेळी ही तुलना केलीय टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं...
सौरवच्या म्हणण्यानुसार, विराट कोहली हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा चांगली बॅटींग करतो. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सौरव म्हणतो, ‘१९९२ सालापासून मी एकदिवसीय क्रिकेट खेळलोय. त्यामुळे मला क्रिकेटबद्दल बोलू शकतो. विराटला मी ज्यापद्धतीनं बॅटींग करताना बघतोय, त्याप्रमाणे त्याच्यासारखी बॅटींग करताना मी सचिनलाही पाहिलेलं नाही. भारतासाठी आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर एवढी चांगली फलंदाजी करणारा खेळाडू मिळालेला नाही. विराट विरुद्ध संघासमोर धावांचं मोठं अंतर निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. मला वाटतं की, बंगुळूरूतला शेवटचा सामनाही असाच मोठ्या अंतराचा आणि रन्सचा असेल. ऑस्ट्रेलियाला विजय मिळवायचा असेल तर त्यांना विराटला आऊट करावंच लागेल’.

नागपूर वन डेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेन्चुरी ठोकून विराटनं भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचे सहा गडी राखून पराभव केला. विराटसोबत शिखर धवननंही सेन्चुरी ठोकलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.