टीम इंडियात परतण्यासाठी इरफानला IPLची शिडी

टीम इंडियातून बाहेर फेकला गेलेला इरफान पठान आयपीएल -7मध्ये सनराइजर्स हैदराबादकडून खेळणार आहे. टीम इंडियात पुन्हा प्रवेश करण्यासाठी त्याला आयपीएलची शिडी करावी लागणार आहे, हेच दिसून येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 15, 2014, 11:38 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीम इंडियातून बाहेर फेकला गेलेला इरफान पठाण आयपीएल -7मध्ये सनराइजर्स हैदराबादकडून खेळणार आहे. टीम इंडियात पुन्हा प्रवेश करण्यासाठी त्याला आयपीएलची शिडी करावी लागणार आहे, हेच दिसून येत आहे. तो बॉलर म्हणून नाही तर बॅटिंगवर भर देत आहे.
सनराइजर्स हैदराबादकडून खेळताना इरफान हा बॅटिंग ऑर्डर करणार आहे. इरफानने सांगितले की, मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियात प्रवेश करण्याची इच्छा आहे. मी व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद संघात चांगली कामगिरी करेन.
29 वर्षीय स्पीनर गेली 10 वर्षे टीम इंडियाकडून खेळताना 29 टेस्ट, 120 वनडे आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.