मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरसोबत चहावाल्याच्या मुलाची निवड!

उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात चहाचं लहानसं दुकान चालवणार्या! राजकुमार शर्मा यांचा १३ वर्षीय मुलगा हृतिक शर्मा याची निवड मुंबईच्या १४ वर्षांखालील क्रिकट संघात करण्यात आली आहे.

Updated: Jan 7, 2014, 07:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात चहाचं लहानसं दुकान चालवणार्या! राजकुमार शर्मा यांचा १३ वर्षीय मुलगा हृतिक शर्मा याची निवड मुंबईच्या १४ वर्षांखालील क्रिकट संघात करण्यात आली आहे.
पॉली उम्रीगर चषकासाठी निवडण्यात आलेल्या मुंबईच्या संघात हृतिक आता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर बरोबर खेळणार आहे. हृतिक कुर्ला इथल्या अलबराकत प्रशालेत इयत्ता सातवीमध्ये तो शिकतोय. तसंच या प्रशालेच्या क्रिकेट स्पर्धेचं तो प्रतिनिधित्व करतो.
या संघाचे प्रशिक्षक भारताचे माजी कसोटीपटू गुलाम पारकर आहेत. एमसीएद्वारे २०१३मध्ये झालेल्या गाइल्स शिल्ड स्पर्धेत अलबराकततर्फे हृतिक शर्मा आणि अर्जुन तेंडुलकर धीरुभाई अंबानी प्रशालेकडून खेळले होते. या स्पर्धेत अलबराकत संघ चॅम्पियन ठरला होता.
या स्पर्धेत सामनावीर म्हणून हृतिक शर्मानं बाजी मारली होती. याच आधारावर त्याची मुंबई संघात निवड करण्यात आली आहे. गरिबीतून वर आलेल्या हृतिकमधील गुणवत्तेमुळं जिल्हय़ातील क्रिकेटप्रेमींत उत्साह वाढला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.