‘आयपीएल’ सीझन ७ : ४८० कोटींचा सट्टा!

फ्रेंचायझींसाठी ‘इंडियन प्रिमिअर लीग’ अर्थात ‘आयपीएल’चा सातवा सीझन एक नवी सुरुवात ठरणार आहे. पुन्हा एकदा आयपीएलच्या टीमची संख्या ९ वरून ८ झाली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 6, 2014, 11:59 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फ्रेंचायझींसाठी ‘इंडियन प्रिमिअर लीग’ अर्थात ‘आयपीएल’चा सातवा सीझन एक नवी सुरुवात ठरणार आहे. पुन्हा एकदा आयपीएलच्या टीमची संख्या ९ वरून ८ झाली आहे. यामुळेच इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच सहारा पुणे वॉरियर्सचे क्रिकेटपटूही लिलावासाठी उपलब्ध होणार आहेत. अनेक टीम्सनी केवळ एकेका क्रिकेटपटूला टीममध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ कल्पना करा की ४८० कोटींचा हा लिलाव कीती रोमांचक असेल याचा...

१२ फेब्रुवारी २०१४... लक्षात ठेवा ही तारीख... कारण १२ फेब्रुवारीला भरणार आहे तो क्रिकेटर्स महामेळा... ‘आयपीएल’च्या सातव्या सीझनसाठी सारेच फ्रेंचायझी आपल्या टीमला मजबूती देण्यासाठी जगभरातील क्रिकेटर्सवर बोली लावणार आहेत. अर्थातच क्रिकेटपटूंवर बोली कुठे लागणार ते अजूनही ठरलेलं नाही. गरज भासल्यास लिलाव हा १३ फेब्रुवारीलाही पुढे सुरु राहू शकतो. सहाव्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंगमुळे आयपीएलची प्रतिमा आणखी मलिन झाली. त्यामुळे बीसीसीआयकडून लिलावाच्या प्रक्रियेत चार बदल करण्यात आले आहेत.
‘आयपीएल सीझन ७’ची वैशिष्ट्ये
२०१४च्या लिलावासाठी फ्रेंचायझींची सॅलरी कॅप असणार आहे ती ६० कोटी रुपयांची... सीझन सातसाठी असणार आहेत एकूण आठ टीम्स. ४८० कोटी रुपये खर्च करून क्रिकेटर्स खरेदी केले जाणार आहेत. या सीझनपासून क्रिकेटर्सना डॉलर्सऐवजी भारतीय रुपयांत पैसै दिले जाणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग काऊंन्सिलच्या नव्या नियमांनुसार फ्रँचायझींना आता आपल्या पूलमध्ये चारऐवजी पाच क्रिकेटपटू ठेवण्याची मुभा असणार आहे.

लिलावासाठी कॅप...

पहिला क्रिकेटर – १२.५ कोटी रुपये
दुसरा क्रिकेटर – ९.५ कोटी रुपये
तिसरा क्रिकेटर – ७.५ कोटी रुपये
चौथा क्रिकेटर – ५.५ कोटी रुपये
पाचवा क्रिकेटर – ४.० कोटी रुपये
नव्या नियमांप्रमाणे आता टीममध्ये १६ पेक्षा कमी आणि २७ पेक्षा जास्त क्रिकेटर्सना टीममध्ये घेता येणार नाही. प्लेईंग इलेव्हनमध्ये चार परदेशी क्रिकेटर्सना ठेवण्याचा जुनाच नियम कायम असणार आहे.

`राईट टू मॅच`चा पर्याय…
‘राईट टू मॅच’ या पर्यायामुळे फ्रेंचायझींना लिलावमध्ये आपल्या क्रिकेटपटूला परत खरेदी करता येणार आहे. एखाद्या क्रिकेटरवरील बोली संपल्यानंतर त्याच्या जुन्या फ्रेंचायझींना त्या क्रिकेटरला आपल्याबरोबर कायम ठेवायचं आहे अथवा नाही? असं विचारण्यात येणार आहे. अर्थात यासाठी फ्रेंचायझींना आपल्या टीममधील जास्तीत-जास्त क्रिकेटर्सना लिलावाच्या पूलमध्ये ठेवावं लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.