हा घ्या माझा फोन, आणि बोला - श्रीसंत

फिक्सिंगप्रकरणी श्रीसंतला ताब्यात घेतले त्यावेळी तो नशेत होता. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या खाली त्याची एसयुव्ही गाडी उभी होती.

Updated: May 21, 2013, 11:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फिक्सिंगप्रकरणी श्रीसंतला ताब्यात घेतले त्यावेळी तो नशेत होता. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या खाली त्याची एसयुव्ही गाडी उभी होती. याच गाडीतून त्याला अटक केली. त्याच्यासोबत एक मुलगी होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

ज्यावेळी दिल्ली पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी श्रीसंतने आरडा-ओरडा करण्यास सुरूवात केली. केरळ तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्या परिचयाचे आहेत. त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मला सोडा असे तो म्हणाल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, ज्यावेळी पोलिसांनी आपले ओळखपत्र दाखविल्यानंतर तो सावध झाला. त्यावेळी त्यांने आपला मोबाईल दिला आणि सांगितले माझ्या परिचयाच्या मुख्यमंत्र्यांशी बोला, अस श्रीसंत म्हणाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास श्रीसंतने अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकार्‍याने नकार दिल्यानंतर श्रीसंतने अटकेसाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याशी बोलण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना होत्या की कोणत्याही परिस्थितीत अटकेचे कारण स्पष्ट करू नये.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.