धावांचं `शिखर` उभारून `धवन` परतला

ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शिखर धवनने शानदार ११५ धावा केल्या आहेत. धवननंतर रोहित शर्माही बाद झाला आहे. रोहित शर्माने १९ धावा केल्या.

Updated: Feb 9, 2014, 10:58 AM IST

ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शिखर धवनने शानदार ११५ धावा केल्या आहेत. धवननंतर रोहित शर्माही बाद झाला आहे. रोहित शर्माने १९ धावा केल्या. शिखर धवनच्या धावांमुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
विराटने ६७ धावा केल्या, धवन आणि विराटने १२६ धावांची पार्टनरशीप केली. त्यापूर्वी शिखर धवननं दणदणीत शतक झळकावलं. त्यामुळे न्यूझीलंडच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताच्या अपेक्षा आणखी मजबूत झाल्या.

चेतेश्वर पुजारा आणि शिखर धवनने आज १ बाद ८७ धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. केवळ नऊ धावा काढल्यानंतर, चेतेश्वर पुजारा बाद झाला, भारताची दुसरी विकेट २३ धावांवर गेली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>