www.24taas.com, कॅनबेरा
ऑस्ट्रेलियाचा सचिनाल सलाम
सचिन क्रिकेटचा नवा डॉन
भारतीयांनी सचिनला कधीचंच क्रिकेटचं दैवत्व बहाल केलं होतं...मात्र ऑस्ट्रेलियानंही सचिनच्या क्रिकेटमधील पराक्रमाला कुर्निसात घातलाय... क्वचितचं प्रतिस्पर्ध्यांचं कौतुक करणा-या ऑस्ट्रेलियानं सचिनला सलाम ठोकलाय...आणि ऑस्ट्रेलियन सरकारनं मास्टर ब्लास्टरला मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान देणार आहे.... क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचं नात खास आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक टेस्ट आणि वन-डे मॅचेस खेळल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यानं कांगारुंविरुद्ध सर्वाधिक रन्स केले आहेत. त्यामुळेच त्याला `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`नं गौरवण्यात आलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाला या दोन देशांना जोडणारा महत्वाचा धागा म्हणजे क्रिकेट.....
दोन्ही देशामध्ये क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच ऍशेसपेक्षाही भारत आणि ऑस्ट्रेलियातील मॅचेस अधिक रंगतदार होतात. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच मास्टर-ब्लास्टरची शिकार करणा-या कांगारुंनी आता सचिनचा गौरव केला आहे. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियानं त्याला सन्मानित करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम नेहमीच सचिनची फेव्हरिट प्रतिस्पर्धी टीम ठरली आहे. क्रिकेटविश्वात बलाढ्य असणा-या या टीमला नेहमीच सचिननं आपल्या बॅटनं तडाखा दिलाय. सचिन कांगारुंवर कायम आपल्या बॅटनं हल्लाबोल करत असतो. मात्र, कुठल्याही क्रिकेटपटूच सहसा कौतुक न करणा-या ऑस्ट्रेलियानं सचिनचा अनोखा सन्मान केलाय.
क्रिकेटमधील या नंबर वन टीमवर सचिनची दहशत ही कायम पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिननं नेहमीच क्रिकेट करिअरमधील सर्वोत्तम इनिंग्ज खेळल्या आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन नहेमीच मास्टर-ब्लास्टरचं कौतुक करतांना दिसत असतात असं म्हटलं तर काहीच वावग ठरणार नाही.