www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या २०० व्या टेस्ट मॅचवर कोट्यवधींचा सट्टा लागणार असल्यानं मुंबई पोलीस सट्टेबाजांवर आणि सट्टा लावणा-यांवर करडी नजर ठेवणार आहे. तब्बल एक हजार कोटींची सट्टा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे.
सचिनची ही शेवटीची टेस्ट असल्य़ानं यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जाण्याचा संशय मुंबई पोलीसांना आहे. जवळपास एक हजार कोटींचा सट्टा सचिनवर लागणार असल्याचं बोलंल जात आहे.
सचिनची २००वी व वानखेडेवरील कारकीर्दीतील अखेरची कसोटी पाहण्याची अनेक क्रिकेटचाहत्यांची इच्छा आहे. अशा चाहत्यांसाठी पाच हजार तिकिटे उपलब्ध होणार आहेत. सचिन तेंडुलकर स्टॅंडसाठी १० हजार रूपये मोजावे लागणार आहेत. मात्र, तिकिटे कोठे मिळतील, याबाबत शाशंकता आहे.
दरम्यान, सचिनची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन सट्टेबाजांनी सट्टा लावण्याची तयारी केल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका नको म्हणून मुंबई पोलीस कामाला लागले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ