टीम इंडियाचाच डंका, कांगारूंना डावाने हरवले...

हैदराबाद टेस्टमध्ये टीम इंडियानं बाजी मारली. भारतीय स्पिनर्ससमोर कांगारुंनी नांगी टाकली आणि भारतानं विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Updated: Mar 6, 2013, 09:20 AM IST

www.24taas.com, हैदराबाद
हैदराबाद टेस्टमध्ये टीम इंडियानं बाजी मारली. भारतीय स्पिनर्ससमोर कांगारुंनी नांगी टाकली आणि भारतानं विजयावर शिक्कामोर्तब केलं. टीम इंडियानं इनिंग आणि १३५ रन्सनं कांगारुंवर विजय मिळवला. आर. अश्विननं ५ विकेट्स घेतल्या तर रवींद्र जाडेजानं तीन विकेट्स घेतल्या. आणि ईशांत शर्मानं एक विकेट घेतली.
चेतेश्वर पुजारा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी झळकावून टीम इंडियाचा विजय अधिक सूकर बनवला. त्याने ३४१ बॉल्समध्ये 59.82च्या सरासरीने ३० फोर्स आणि १ सिक्सच्या मदतीने २०४ रन्सची दमदार इनिंग खेळली. या कामगिरीसाठी पुजारालाच प्लेअर ऑफ द मॅचने गौरवण्यात आलं.

पहिल्या इनिंगमध्ये २०४ रन्सची निर्णायक इनिंग खेळणारा चेतेश्वर पुजारा भारताच्या विजयाचा ख-या अर्थानं शिल्पकार ठरला. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीनं सौरव गांगुलीचा सर्वाधिक टेस्ट मॅचेस जिंकण्याचाही त्याने पराक्रम केला आहे. हैदराबाद टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमवर इनिंगनं पराभव पत्करावा लागला आहे.

स्पिनर्सच्या प्रभावी मा-यासमोर कांगारु बॅट्समनचं काहीच चाललं नाही. भारतीय स्पिनर्सनी आपल्या स्पिनच्या तालावर ऑस्ट्रेलियन टीमला चांगलचं नाचवलं. रवींद्र जाडेजानं मायकल क्लार्क आणि एड कोवनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर मॉझेस हेन्रिक्सही शून्यावर रनआऊट झाला. आर. अश्विनने ५ विकेट घेतल्या तर रविंद्र जडेजाने ३ विकेट घेत त्याला सुंदर साथ दिली. तर महत्त्वाच्या वेळी दुहेरी शतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा सामन्याचा मानकरी ठरला.