www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली
बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदाचा पदभार अजूनही स्वीकारता येणार नाही. सुप्रिम कोर्टानं बीसीसीआयला नवी चौकशी समिती नेमण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं श्रीनिवासन यांना मोठा झटका सुप्रीम कोर्टानं दिला आहे.
न्यायमूर्ती मुदगल हे या समितीचे अध्यक्ष असतील. बीसीसीआयकडून नव्या नावांची मागणी सुप्रिम कोर्टानं केली आहे. आता श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
२९ सप्टेंबरला झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, त्यांना बिहार क्रिकेट असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत पदभार स्वीकारता येणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.