न्यूझीलंड विजयी, भारताने मालिका गमावली

भारताने न्यूझीलंडसमोर २७९ धावांचे टार्गेट ठेवले होते. न्यूझीलंडने ३ विकेटच्या बदल्यात ते सहज पार केले आणि ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराभवामुळे पाच सामन्यांची वन डे मालिका भारताने ३-० ने गमावली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 28, 2014, 07:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,हॅमिल्टन
भारताने न्यूझीलंडसमोर २७९ धावांचे टार्गेट ठेवले होते. न्यूझीलंडने ३ विकेटच्या बदल्यात ते सहज पार केले आणि ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराभवामुळे पाच सामन्यांची वन डे मालिका भारताने ३-० ने गमावली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं न्यूझीलंडसमोर २७९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १३० धावांच्या भागीदारी करत विजयाचा पाया निश्चित केला. मग टेलरनं आपल्या वन डे कारकीर्दीतलं नववं शतक ठोकून न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
या पराभवामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यासह भारताने मालिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले स्थान कायम राखण्याची संधीही गमावली आहे. न्यूझीलंडने भारताचा एक दिवसीय सामन्यात ११ चेंडू आणि पाच गडी राखत आरामात पराभव केला आणि पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली.
रॉस टेलरने १२७ चेंडूंमध्ये नाबाद ११२ धावा करत भारताच्या जिंकण्याच्या आशेवर पाणी फिरवले. रोहित शर्मा, ढोणी व जाडेजाने अर्धशतके झलकावली, परंतु न्यूझीलंडला पराभूत करण्याएवढी मोठी धावसंख्या उभारण्यात भारताला अपयश आले. भारताच्या सुमार गोलंदाजीला लीलया खेळत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हे लक्ष्य ४८.१ षटकांमध्ये सहज गाठले.
गप्टील(३५), रायडर(१९) व विल्यमसन (धावबाद ६०) हे तीन खेळाडू बाद झाले तर टेलर (११२) व मॅकलम (४९) नाबाद राहिले. त्याआधी भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर जिंकण्यासाठी २७९ धावांचे आव्हान ठेवले. ५० षटकांत ५ गडी गमावत भारताने २७८ धावा केल्या. रोहित शर्मा (७९), विराट कोहली(२), अजिंक्य रहाणे (३), रायडू(३७), अश्विन(५), कर्णधार धोनी ( नाबाद ७९) आणि जडेजा (६२) अशी भारतीय खेळाडूंची धावसंख्या होती. न्युझीलंडच्या साऊथीने २, तर मिल्स विल्यमसन आणि बेनेटने प्रत्येकी १ बळी घेतला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.