वर्ल्डकपसाठी भारताचं नेतृत्व मितालीकडे

भारतानं पुढच्या महिन्यात मुंबईत होणाऱ्या महिला विश्वकप क्रिकेटसाठी भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिची कॅप्टनपदी निवड केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 1, 2013, 04:07 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतानं पुढच्या महिन्यात मुंबईत होणाऱ्या महिला विश्वकप क्रिकेटसाठी भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिची कॅप्टनपदी निवड केलीय.
१५ सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट टीमचं नेतृत्व मिताली करणार आहे. आयसीसी महिला विश्वकप ३१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेची फायनल मॅच १७ फ्रेब्रुवारी रोजी मुंबईच्या सीसीआय मैदानवर खेळली जाईल. यजमान भारताची पहिली मॅच टूर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत असा हा सामना रंगतोय.

अशी असेल भारतीय टीम
मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर, झूलन गोस्वामी, अमिता शर्मा, गौहर सुल्ताना, एम. तिरुषकामिनी, सुलक्षणा नाईक, एकता बिश्ट, मोना मेशराम, रासनारा परवीन, निरंजना नागराजन, पूनत राऊत, रिमा मल्होत्रा, करुण जैन आणि शुभालक्ष्मी शर्मा.