www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
रणजी करंडक जिंकण्याचं महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं आहे. २१ वर्षांनंतर आलेली संधी महाराष्ट्र संघाने दवडली. कर्नाटककडून महाराष्ट्र ७ विकेट्सनी पराभूत झाला.
महाराष्ट्रावर ७ विकेट्सनी मात करत कर्नाटकनं रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या पराभवासह महाराष्ट्राचं २१ वर्षांनी रणजी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. तर कर्नाटकनं सातव्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली.
कर्नाटकनं याआधी १९९८-९९ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. तर २००९-१० मध्ये मुंबईकडून त्यांना फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तत्पूर्वी, महाराष्ट्रची टीम दुस-या इनिंगमध्ये ३६६ रन्सवरच ऑल आऊट झाली. केदार जाधवच्या ११२ रन्सच्या जोरावरच महाराष्ट्राला साडेतीनशेहून अधिक रन्स करता आल्या.
महाराष्ट्रानं कर्नाटकसमोर विजयासाठी १५७ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. कर्नाटकनं हे आव्हान ३ विकेट्स गमावूनच पार केलं. चिराग खुरानानं सिक्स मारत आपल्या टीमला विजश्री मिळवून दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.