www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंगहॅम
भारत टीम काहीही करू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा वेस्टइंडीजमध्ये पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनी हा आजारातून बरा झाला आणि अंतिम सामन्यात खेळला. त्याने शेवटच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार मारल्यानंतर टीम इंडियाने धम्माल केली.
भारताचा एका सामन्यात पराभव झाला आणि टीम इंडिया ट्राय सिरीजमधून बाहेर जाणार असे वाटत होते. त्याचच धोनी आजारी पडला. त्याच्या गैरहजेरीत विराट कोहलीने कमाल केली. त्यांने आपल्या हिम्मतीवर टीमला विजय मिळवून दिला. त्यातच चांगले रनरेट ठेवण्याचे उद्दीष्टही होते. ते पार पाडल्यानंतर अंतिम सामन्यात धोनीने आपणच बाजीगर असल्याचे सिद्ध केले.
ट्रीय सिरीजमध्ये वेस्ट इंडीज आणि श्रीलंका या टीम, टीम इंडियाच्याज यंग ब्रिगेडसमोर निष्फळ ठरल्यात. शिखर धवनने तब्बयल दोन वर्षांनंतर टीममध्यें पुनरागमन करून प्रतिस्पिर्धी संघाच्या गोलंदाजांना पळता भुई थोडे करून टाकले. त्याचला अष्टलपैलू रवींद्र जडेजानेही सुरेख साथ दिली.
रोहित शर्मा, विराट कोहली, ईशांत शर्मा, उमेश यादव, दिनेश कार्तिक, भुवनेश्वटर कुमार. प्रत्येथक खेळाडूने आपल्या कामगिरीने विदेशी भूमी गाजवली. त्यावमुळे इंग्लंडला जाण्याडपूर्वी टीम इंडियावर टीका करणाऱ्यांना या विजयामुळे चपराक बसली आहे.
इंग्लंवडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स् ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. तसेच सराव सामन्यातही त्यांनी प्रत्येक संघाला चांगलेच ठोकून काढले. अशा कठोर मेहनतीनंतर जेव्हां टीमने हा किताब मिळवला तेव्हात सर्व खेळाडूंनी नाचून आपला आनंद व्यक्त केला. रोहित शर्माने भांगडा तर विराट कोहलीने गंगनम स्टाईल डान्सह करून विजयाची धम्माल केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.