इंग्लंडचे माजी कॅप्टन टोनी ग्रेग यांचे निधन

इंग्लंडचे माजी कॅप्टन आणि प्रसिद्ध कॉमेन्टेटर टोनी ग्रेग यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ह्रदयविकारच्या झटक्याने ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत निधन झालं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 30, 2012, 09:52 AM IST

www.24taas.com,सिडनी
इंग्लंडचे माजी कॅप्टन आणि प्रसिद्ध कॉमेन्टेटर टोनी ग्रेग यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ह्रदयविकारच्या झटक्याने ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत निधन झालं.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांना कॅन्सर झाल्याचंही निष्पन्न झालं होतं. ६ फूट ६ इंच उंचीचे असणा-या टोनी ग्रेग यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील क्वीन्स टाऊन येथे ६ ऑक्टोबर १९६६ साली झाला.
क्रिकेटमधील मैदानावरील परफॉर्मन्सपेक्षा ग्रेग आपल्या कॉमेंट्रीसाठी प्रसिद्ध होते.आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे ग्रेग यांनी क्रिकेट समालोचन चवदार आणि रंगतदार बनविले होते.
१९७२ ते १९७७ या पाच वर्षांच्या काळात त्यांनी इंग्लंडसाठी ५८ टेस्ट खेळल्या... तसंच २२ वन-डेत ग्रेग यांनी २५९ रन्स करत १९विकेट्सही काढल्या होत्या.