धोनीची कोलांटउडी, गंभीर चांगला खेळाडू

गौतम गंभीरच्या स्वार्थी खेळाची बीसीसीआयकडे तक्रार करणाऱ्या धोनीने अचानक कोलांटउडी घेऊन आपण अशी कोणतीच तक्रार केली नसल्याचा खुलासा केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 12, 2012, 10:23 PM IST

www.24taas.com, नागपूर
गौतम गंभीरच्या स्वार्थी खेळाची बीसीसीआयकडे तक्रार करणाऱ्या धोनीने अचानक कोलांटउडी घेऊन आपण अशी कोणतीच तक्रार केली नसल्याचा खुलासा केला आहे.
गंभीर हा स्वार्थी आणि टीमचे नुकसान करणारा क्रिकेटपटू आहे. तो केवळ टीममधील आपले स्थान कायम राखण्यावर लक्ष केंद्रीत करतो. जर अश्विन रन्स करू शकतो तर गंभीर रन्स का नाही करू शकत. मुंबई टेस्टमध्ये त्याने स्वान आणि पानेसरच्या बॉलिंगचा सामना न करता तळाच्या बॅट्समनना त्यांच्या बॉलिंगचा सामना करायला भाग पाडले. गंभीरच्या हलगर्जीपणामुळे कोलकाता टेस्टमध्ये सेहवाग आणि पुजारा आऊट झाले.
मात्र, संध्याकाळ होताच धोनी गंभीरवर केलेल्या आरोपापासून फिरला आणि तो एक शानदार खेळाडू असल्याची कौतुकाची थापही दिली. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीमुळे टीमचे प्रदर्शन खराब होत असल्याचे म्हटले. या दोन वरिष्ठ् खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीमला अशा अवस्थेतून जावे लागणार हे निश्चित होते. यामध्ये संघातील सध्याच्या खेळाडूंची कोणतीच चूक नाही, असे धोनी म्हणाला.