`क्रिकेटर` श्रीसंत लागला `धंद्याला`...

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात येण्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात श्रीसंतला ठुमक ठुमक नाचताना पाहिलाच असेल... पण, आता मात्र त्याच्या फॅन्सला (उरल्या-सुरलेल्या) त्याला सिनेमात अभिनय करताना पाहता येणार नाही. एव्हढंच नाही तर श्रीसंत एका सिनेमासाठी म्युझिकही तयार करणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 1, 2014, 06:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात येण्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात श्रीसंतला ठुमक ठुमक नाचताना पाहिलाच असेल... पण, आता मात्र त्याच्या फॅन्सला (उरल्या-सुरलेल्या) त्याला सिनेमात अभिनय करताना पाहता येणार नाही. एव्हढंच नाही तर श्रीसंत एका सिनेमासाठी म्युझिकही तयार करणार आहे.
आयपीएलमधून सध्या श्रीसंतला बॅन केलं गेलंय. त्यामुळे, आता फिल्म इंडस्ट्रीत हात-पाय मारण्याची श्रीसंतची धडपड सुरू आहे. तो तमिळ आणि तेलगुमध्ये बनत असलेल्या एका सिनेमाचं म्युझिक दिग्दर्शन करणार आहे. तसंच या सिनेमामध्ये त्याला एक छोटीशी भूमिकादेखील दिली गेलीय. श्रीसंतचा मोठा भाऊन संथानन या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.
याशिवाय, लवकरच श्रीसंत छोट्या पडद्यावरही एन्ट्री घेऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, डान्स रिअॅलिटी सो ‘झलक दिखला जा’च्या नव्या सीझनमध्येही श्रीसंत सहभागी होणार आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर श्रीसंतच्या करिअरचं काय होणार? हा साहजिकच प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल... पण, श्रीसंतला मात्र त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालंय असं म्हणायला हरकत नाही.
श्रीसंतवर आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग करण्याचा आरोप आहे. याच प्रकरणी 16 मे रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.