IPLमधून ललित मोदींची कायमची हकालपट्टी होणार?

भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय आज आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची आयपीएलमधून कायमची हकालपट्टी करण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टानं बीसीसीआयला दिल्लीत विशेष सर्वसाधारण सभा घ्यायला परवानगी दिलीय. २००८-१० या कालावधीत आयपीएल अध्यक्ष राहिलेल्या मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका बोर्डानं ठेवला होता.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 25, 2013, 10:52 AM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय आज आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची आयपीएलमधून कायमची हकालपट्टी करण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टानं बीसीसीआयला दिल्लीत विशेष सर्वसाधारण सभा घ्यायला परवानगी दिलीय. २००८-१० या कालावधीत आयपीएल अध्यक्ष राहिलेल्या मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका बोर्डानं ठेवला होता.
मोदींनी पतियाळा हाऊस कोर्टातून स्थगिती आदेश मिळविला होता पण दिल्ली हायकोर्टानं बीसीसीआयला अपेक्षित निकाल दिलाय. अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे यांच्या शिस्तपालन समितीनं ४०० पानांचा अहवाल तयार केला आहे. या अहवालावर सर्वसाधारण सभेत अहवालावर चर्चा होणार आहे. या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याकडे असेल.
मोदींवर कायमच्या बंदीची कारवाई करण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक असेल. याचा अर्थ बीसीसीआयशी संलग्न असलेल्या ३१ संस्थांपैकी २१ जणांनी मोदींच्या बंदीच्या बाजूनं मतदान करणं गरजेचं आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन वगळता अन्य कुणाकडूनही मोदींना पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही.
दरम्यान, २९ सप्टेंबरला भारतीय क्रिकेट बोर्डाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक चेन्नईत होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.