कुंबळेने शोधला एक अनोखा स्पिनर

 म्हणतात ना हिऱ्याची ओळख जोहरीला असते. क्रिकेट जगतातील अशा एका जोहरीने एक हिरा निवडला आहे. त्या पाहून आपण म्हणू की हा क्रिकेट खेळायच्या लायक नाही. 

Updated: Jan 21, 2015, 08:17 PM IST
 कुंबळेने शोधला एक अनोखा स्पिनर title=

बंगळुरू :  म्हणतात ना हिऱ्याची ओळख जोहरीला असते. क्रिकेट जगतातील अशा एका जोहरीने एक हिरा निवडला आहे. त्या पाहून आपण म्हणू की हा क्रिकेट खेळायच्या लायक नाही. 

कर्नाटकच्या विजापूरचा शंकर सज्जन दोन्ही हातांनी अपंग आहे. पण त्याची निवड स्पिनर म्हणून करण्यात आली आहे. त्याची ही निवड केली भारताचा महान फलंदाज अनिल कुंबळे यांने...

कर्नाटकमध्ये गेल्या दोन महिन्यापासून स्पिन स्टार्स हंट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सुमारे २ हजार स्पिनरमधून ११० खेळाडू निवडले या खेळाडूंनी बंगळुरूच्या एनआरए मैदानात आपली चुणूक दाखवली. 

यावेळी शंकरने आपल्या प्रतिभेने सर्वांना हैराण केले. १७ वर्षांच्या या अपंग युवकाच्या गोलंदाजीवर कुंबळे असा फिदा झाला की अंतीम २० च्या यादीत त्याने शंकरला सामावून घेतले. या पूर्वी त्याचे नाव या यादीत नव्हते. 

शंकरला या स्पिन हंटची माहिती एका स्थानिक वर्तमानपत्रातून मिळाली. निवड कुंबळे करणार असल्याचे कळाल्यावर त्याने थेट बंगळुरू गाठले. 

शंकरने तीन वर्षापूर्वी विजापूरच्या एका क्रिकेट क्लबमध्ये ट्रेनिंग घ्याला गेला होता. पण तो अपंग असल्याने त्याला ट्रेनिंग देण्यास थोडे टाळले. पण शंकरची टिच्चून गोलंदाजी आणि प्रतिभा पाहून कोचने त्याला ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली. आता हाच शंकर कुंबळेच्या पसंतीला उतरला आहे. कुंबळे सारखा महान गोलंदाज व्हायचे आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.