मुंबई : काही दिवसांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरणात देशातील अनेक मोठ्या व्यक्तींचं नाव पुढे आलं होतं ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचं देखील नाव होतं. यानंतर अमिताभ यांनी या गोष्टी फेटाळून लावल्या होत्या पण काही कागदपत्रांमुळे अमिताभ यांचा दावा खोटा ठरला आहे.
इंडियन एक्सप्रेसने अमिताभ बच्चन यांच्याशी संबधित पनामा पेपर्स प्रकरणातील २ कागदपत्र जाहीर केले आहेत. ज्यामध्ये लिहिलं आहे की, अमिताभ बच्चन ‘सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड’चे डायरेक्टर म्हणून कामकाज सांभाळणार आहे. अमिताभ हे टेलिफोन कॉन्फ्रेंस द्वारे मिटींगमध्ये सहभागी असायचे असं दिखील यामधून पुढे आलं आहे.