भारताची २४६ रन्सची आघाडी, न्यूझीलंड १ बाद २४

दुसऱ्या कसोटीवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारताने आपली पकड मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणेचे शतक आणि शिखर धवनच्या ९८ रन्स खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २४६ रन्सची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था एक बाद २४ अशी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 15, 2014, 11:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन
दुसऱ्या कसोटीवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारताने आपली पकड मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणेचे शतक आणि शिखर धवनच्या ९८ रन्स खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २४६ रन्सची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था एक बाद २४ अशी आहे.

झहीर खाननं पीटर फुल्टनला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा केन विल्यमसन ४ रन्सवर आणि हॅमिश रुदरफोर्ड १८ रन्सवर खेळत आहे. न्यूझीलंड अजूनही २२२ रन्सनी पिछाडीवर असून त्यांच्या हाताशी ९ विकेट्स बाकी आहेत.
भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये ४३८ रन्सवर ऑल आऊ झाली आहे. धोनीब्रिगेडला २४६ रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यात यश आलं आहे. अजिंक्य रहाणेनं ११८ रन्सची शानदार इनिंग खेळत भारतीय टीमला चारशे रन्सचा टप्पा पार करून दिला. त्याची टेस्ट करिअरमधील ही पहिलीच सेंच्युरी ठरली.
विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा झटपट आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणेनं एक बाजू लावून धरत भारताची इनिंग सावरली. आता २४६ रन्सनं आघाडी घेतल्यानं भारताला वेलिंग्टन टेस्ट जिंकण्याची नामी संधी आहे.
वेलिंग्टन टेस्टमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडवर आघाडी घेतलीय.
आज सकाळी शिखर धवन आणि ईशांत शर्मा या जो़डीनं खेळ सुरु केला. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या ईशांतनं २६ रन्स काढले. तर शिखर धवनची सेंच्युरी अवघ्या २ रन्सने हुकली. टीम साऊदीनं त्याला आऊट केलं. रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. रोहित आऊट झाल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य राहणे या जोडीनं लंचपर्यंत टीम इंडियाची पडसड होऊ दिली नाही. मात्र लंचनंतर विराट कोहली ३८ रन्सवर आऊट झाला.
ईशांत शर्माच्या भेदक मा-यापुढे न्यूझीलंडची टॉप ऑर्डर कोसळली. महेंद्र सिंग धोनीनं टॉस जिंकला आणि न्यूझीलंडला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं.धोनीचा हा विश्वास ईशांतन सार्थ ठरवत किवींना पाच धक्के दिले. त्यामोहम्मद शामीनं कॅप्टन मॅकलमला आऊट करत टीम इंडियाला महत्वपूर्ण यश मिळवून दिलं. या सीरिजमध्ये धोनी ब्रिगेडच्या विजयाची पाटी अजुनही कोरीच आहे. सततच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचे टेस्टमधले दुसरे स्थान धोक्यात आले असून आता ही टेस्ट जिंकून परदेशातल्या पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान टीम समोर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.