जेव्हा सलमानचं लकी ब्रेस्लेट हरवलं!

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचं लकी ब्रेस्लेट हरवल्याची चर्चा आहे. हे ब्रेस्लेट सलमानच्या खूप जवळचं होतं. ते त्याच्या वडिलांनी सलीम खान यांनी अनेक वर्षांपूर्वी त्याला गिफ्ट केलं होतं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 7, 2014, 02:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचं लकी ब्रेस्लेट हरवल्याची चर्चा आहे. हे ब्रेस्लेट सलमानच्या खूप जवळचं होतं. ते त्याच्या वडिलांनी सलीम खान यांनी अनेक वर्षांपूर्वी त्याला गिफ्ट केलं होतं.
एका वृत्तपत्रानं दिेलेल्या बातमीनुसार सलमान एका पार्टीसाठी पनवेलमधील फार्महाऊसवर गेला होता. तिथंच त्याचं ब्रेस्लेट हरवलं. सलमानचा स्टाफ, ड्रायव्हर आणि बॉडिगार्डने सलमानचं लकी ब्रेस्लेट शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ब्रेस्लेट काही मिळालं नाही.
सलमान आपल्या ब्रेस्लेटला ‘लकी चार्म’ मानतो. त्यामुळंच तो नेहमी या ब्रेस्लेटसह दिसायचा. सलमानच्या एका मित्रानं ब्रेस्लेट हरवल्याचं निदर्शनास आणून दिलं. लकी ब्रेस्लेट हरवल्यानंतरही सलमान शांत असला तरी त्याची नाराजी आणि चिंता चेहऱ्यावर दिसत होती, असं सूत्रांनी सांगितलं.
सलमानचा `जय हो` मधील को-स्टार अश्मित पटेल जो की सलमानच्या फार्महाऊसवर आला होता. त्याला हे लकी ब्रेस्लेट मग स्विमिंग पूलजवळ खाली पडलेलं सापडलं. मग ते त्यानं सलमानला परत केलं. आपलं लकी ब्रेस्लेट सापडलेलं बघून अखेर सलमानच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं, असंही सूत्रांनी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.