पाहा ट्रेलर: शाहीद कपूर आणि सोनाक्षीचा ‘R...राजकुमार’

‘फटा पोस्टर निकला हिरो’नंतर आता अभिनेता शाहीद कपूर प्यार...प्यार...प्यार... आणि मार...मार...मार... म्हणत प्रेक्षकांसमोर येतोय. नुकतंच शाहीद-सोनाक्षी आणि सोनू सूदचा आगामी चित्रपट ‘आर...राजकुमार’चं ऑफिशियल पहिलं ट्रेलर लाँच करण्यात आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 2, 2013, 09:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘फटा पोस्टर निकला हिरो’नंतर आता अभिनेता शाहीद कपूर प्यार...प्यार...प्यार... आणि मार...मार...मार... म्हणत प्रेक्षकांसमोर येतोय. नुकतंच शाहीद-सोनाक्षी आणि सोनू सूदचा आगामी चित्रपट ‘आर...राजकुमार’चं ऑफिशियल पहिलं ट्रेलर लाँच करण्यात आलंय.
चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलंय. शिवाय यात त्यानं छोटा रोलही केलाय. शाहीद कपूर यात भरपूर अॅक्शन करतांना दिसेल. “मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे”, असं शाहीद म्हणाला.
इरोज इंटरनॅशनलचा हा चित्रपट आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत विकी राजानी. आज रिलीज झालेल्या रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ चित्रपटासोबत ‘राजकुमार’चा ट्रेलर बघता येईल.
‘R...राजकुमार’ ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा ट्रेलर