www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त जेलमध्ये गेल्यानंतर आता त्याची मुलगी त्रिशला दत्त हिनं आपलं मौन सोडलंय. संजय दत्तच्या कठिण काळात, तो जेलमध्ये जाण्याच्यावेळी त्रिशलानं त्याची भेट का घेतली नाही? असा अनेकांनी विचारलेल्या प्रश्नाला अखेर तिनं उत्तर दिलंय.
त्रिशला ही गेल्या अनेक दिवसांपासून मीडियापासून चार हात लांबच आहे. कोर्टात अनेक खटपटीनंतर संजय दत्त टाडा कोर्टासमोर शरण गेला त्यावेळी त्रिशलाची अनुपस्थिती अनेकांना जाणवली होती. संजय दत्तला त्रिशला भेटायला जाण्यास परवानगी नव्हतीच पण त्रिशलानं मुंबईत आली नव्हती. याबद्दल उठणाऱ्या अनेक वावड्यांना त्रिशलानं आपल्या ब्लॉगद्वारे उत्तर दिलंय.
त्रिशलानं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय, ‘मला माहीत आहे की तुम्हाला सगळ्यांनाच याची माहिती असेल की गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या वडिलांसोबत काय काय झालंय आणि तुम्हाला जर हे माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या वडिलांना तीन वर्षांचा शिक्षा झालीय. खरं तर, मला स्वत:ला आश्चर्य वाटतंय की इतकं सगळं झाल्यानंतरही मी इतकी शांत का आहे?’
‘मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते. ते माझ्यासाठी सगळं काही आहेत. मला आश्चर्य वाटतं की माझ्या वडिलांनी शरणागती पत्करली त्यावेळी माझ्या अनुपस्थितीवर, इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यावर आणि मी शांत राहण्यावर लोकांना इतके प्रश्न का पडावेत आणि त्याची इतके वेगवेगळे अर्थ का काढले जात आहेत. यावेळी कुणाच्याही डोक्यात एकदाही ही गोष्ट आली नाही की कदाचित माझ्या वडिलांनीच मला मुंबईला येण्यास नकार दिला असेल. मी मुंबईला शेवटचं जानेवारी २००७ मध्ये आले होते. तेव्हाही मान्यता आणि माझ्याबद्दल मीडियानं बऱ्याच अफवा उठवल्या होत्या.’
सध्या माझं कुटुंबच मोठ्या कठिण प्रसंगातून जातंय आणि आता मला आणि माझ्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा मीडियाचा निशाणा बणायचं नाही. एक वेळ अशी होती जेव्हा मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. हा माझ्या आजपर्यंतचा सर्वात चुकीचा निर्णय होता. हट्टीपणात मी हा निर्णय घेतला होता. पण, नशिब मी बॉलिवूडमध्ये समावले गेले नाही. मी वेडेपणात हा निर्णय घेतला होता. पण, आता मला माहीत आहे की मला नेमकं काय करायचंय. आणि तो मार्ग नक्कीच बॉलिवूडकडे वळत नाही...'
‘गेल्या सहा वर्षांमध्ये माझ्या आणि माझ्या वडिलांबद्दल मीडियामध्ये अनेक गोष्टींची चर्चा सुरू आहे. माझ्यासाठी हेच चांगलं आहे की मी इकडेच राहून या कठिण प्रसंगात माझ्या कुटुंबीयांना मीडियामुळे आणखी त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.’
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.