www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज फस्ट डे फस्ट शोचा दिवस. अर्थात शुक्रवार. बॉलिवूडचा अत्यंत गाजलेला ‘शोले’ हा ‘थ्रीडी’ रुपात पुन्हा एकदा रिलीज केला जातोय. तसेच सध्या ज्याच्या गाण्यांनी सर्वांना भुरळ घातलीय़ असा झी टॉकीजचा ‘टाईमपास’ आणि अर्शद वारसीचा ‘जोबी करवालो’ हे चित्रपट वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
बॉलिवूड तसेच मराठी सिनसृष्टीची 2014ची सुरुवात मोठी झोकात होणार आहे. शोले थ्रीडी तसेच झी टॉकिजचा
टाईमपास आणि जोबी करवालो हे तीन चित्रपट उद्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.जवळपास गेली चार दशकं शोलेची जादू सिनेरसिकांवर कायम असून प्रेक्षकांना आता थ्री-डी रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.जय-विरु, गब्बर ,बसंती,ठाकूर हे कॅरेक्टर थ्री-डी रुपात पाहतांना प्रेक्षकांना वेगळाच आनंद मिळणार आहे....
शोले प्रमाणे टाईमपास या मराठी सिनेमाची सिनेरसिकांमध्ये मोठी उत्सूकता होती. मला वेड लागले या गाण्याने धमाल केली आहे. रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमाची गाणी रसिकांच्या ओठावर रुळली आहे.रवी जाधव यांनी टिनएजर लव्हस्टोरी या चित्रपटात गुंफली आहे. या दोन चित्रपटाबरोबरच आर्शद वारसीचा जोबी करवालो हा चित्रपट रिजीज होतोय..या सिनेमात आर्शद डिटेक्टीव्ह बनला आहे. शुक्रवारी रिलीज होणा-या या तीन्ही चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याचा अंदाज बांधण तसं कठीण आहे.
दरम्यान, झी टॉकीजचा टाईमपास सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मुंबईत प्लाझा आणि नक्षत्रमधील शो हाऊसफुल्ल झालेत. २०१४ च्या सुरुवातीलाच मराठी सिनेमानं जोरदार सलामी दिलीये. नटरंग, बापक-पालक नंतर दिग्दर्शक रवी जाधव हीट सिनेमांची हॅट्रीक करणार का याची उत्सुकता मराठी सिनेसृष्टीत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ