www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
बॉलिवूडमध्ये सध्या काही होईल हे सांगता येणार नाही. चक्क अभिनेता शाहरूखने दीपिका पदुकोणला आपल्या बाहुपाशात घेत तिला उचलले. तेवढ्यावरच न राहता तो चालत सुटला.
शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी `चेन्नई एक्सप्रेस` या सिनेमाचे शुटींग सुरू आहे. या शुटींग दरम्यान, दोघांच्यात अनेक दिलचस्पी संवाद सुरू आहेत. दक्षिण भारतात सुरू असलेल्या शुटींग दरम्यान लग्नाचा सीन सुरू होता. यावेळी शाहरूखने दीपिकाला आपल्या कवेत घेत उचलले. तब्बल ८०० पाऊल तो दीपिकाला उचलून घेऊन चालत गेला. तो एवढ्यावच न थांबता त्यांने त्याच अवस्थेत घेऊन लग्नाचे फेरेही मारले.
याबाबत शाहरूखला विचारले असतो तो काहीही बोलला नाही. आपल्या मेहनतीवर त्याने भर असल्याचे म्हटले. मात्र, आपण ८०० पाऊले चाललो का, असा प्रतिप्रश्न केला. तामिळनाडू राज्यात चुंकी मन्नारमध्ये लग्नाची वेगळी परंपरा आहे. या परंपरेनुसार होणाऱ्या पत्नीला उचलून घेवून किमान ८०० पावले चालायचे असते. त्यामुळे पती आणि पत्नीमधील संबंध अधिक चांगले घट्ट होतात.
शाहरूखचा हा सिनेमा २०१३मध्येच रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. या सिनेमाला २०१२मध्ये सुरूवात झाली आहे.या सिनेमात आधी कतरिना कैफ हिला स्थान देण्यात आले होते. मात्र, कॅटने नकार दिला. कारण शाहरूख खानबरोबर काम करणार नसल्याचे तिने म्हटले होते. त्यामुळे दीपिकाची वर्णी या चित्रपटात लागली. त्यामुळे कॅट ऐवजी शाहरूखला दीपिकाला उचलून घ्यावे लागले.
दरम्यान, शुटींग दरम्यान, शाहरूख, दीपिका आणि रोहित यांची टीम बिस्किट खाऊन आपला आठवडा घालवित आहेत. त्यांना केवळ रात्रीचेच जेवण मिळत आहे. या चित्रपटाचे काही शुटींग गोवातील दुधसागर येथे सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.