संजूबाबा आजारी, मुंबईला हलविणार

शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची प्रकृती बिघडली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 23, 2013, 02:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची प्रकृती बिघडली आहे. जादा धूम्रपान आणि उच्च रक्तदाब हे त्याच्या प्रकृती बिघडली आहे. यावरील उपचारासाठी त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
चार डॉक्टरांच्या एका टीमने गेल्या शनिवारी तुरुंगात जाऊन संजय दत्तची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला सीटी ऍन्जिओग्राम आणि आर्टेरियल ऍन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. या पथकातील एका डॉक्टरच्या मते संजय दत्तला पेरिफेरियल आर्टेरियल डिसीज अर्थात पॅड याचा त्रास जाणवत आहे.
या व्याधीमुळे त्याच्या दोन्ही पायांपर्यंत होणार्या रक्ताच्या पुरवठ्यात खंडितपणा आला आहे. डॉक्टरांच्या पथकाने संजय दत्तबाबत दिलेल्या सल्ल्याची दखल घेऊन येरवडा तुरुंग अधिकार्यां नी संजय दत्तवर जे. जे. रुग्णालयात उपचार करून घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठीची मंजुरी मिळावी यासाठी राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.