www.24taas.com, मुंबई
‘सलमान भाय’ हा सल्लूच्या चाहत्यांची त्याला हाक मारण्याची फेव्हरेट स्टाईल… पण, सलमान मात्र ‘भाई’ या शब्दावर जाम तापलाय. त्याला ‘भाई’ म्हणण्याचा अधिकार सर्वांनाच नाही, अशी तंबीच त्यानं दिलीय.
एका मुलाखतीदरम्यान, दबंग सलमाननं म्हटलंय की अनोळखी लोकांनी त्याला ‘भाई’ संबोधल्यावर त्याला चांगलं तर अजिबात नाही पण राग मात्र नक्की येतो. सल्लू म्हणतो, ‘अनेक प्रकारची लोकं मला भाई म्हणून संबोधतात. ओळखीचे अन् अनोळखीही. पण सगळयांनाच माझा उल्लेख भाई म्हणून करण्याचा अधिकार अजिबात नाहीय. मला, हे सलमान, मिस्टर खान किंवा ओय सलमान खान... अशा हाका मारलेल्या मला निश्चितच आवडतात. पण जेव्हा कुणी मला भाई म्हणून हाक मारतं तेव्हा ते खूप वेगळं वाटतं. सल्लू म्हटलं तर मला त्याची चीड येते. काही काही वेळा ही दोन्ही शब्दांच्या उच्चाराचा टोनही वेगळा असतो. फक्त सोहेल आणि अरबाज या दोघांनाच मला भाई म्हणण्याचा हक्क आहे आणि इतरांसाठी माझ्या आई-वडिलांनी मला एक चांगलं नाव दिलंय – सलमान खान. तेव्हा इतरांनी मला सलमान म्हणूनच हाका मारव्यात. मला वाटतंय की मला सल्लू या नावानं हाक मारण्याची सुरुवात जॅकी श्रॉफनं केलीय’.
सलमान सध्या त्याच्या आगामी दबंग – २ च्या तयारीत व्यस्त आहे. अरबाजच्या कामगिरीवर तो चांगलाच खूश आहे. तो म्हणतो, ‘अभिनव जेव्हा या सिनेमाची कथा घेऊन माझ्याकडे आला होता तेव्हा ती कहाणी एका आर्ट फिल्मची असावी अशी होती. अरबाजनं या कथेला एक कमर्शिअल टच दिलाय. अनुरागनं आपल्या स्टाईलचा तडका देत त्याला थोडा मसाला टच दिलाय. दबंगमध्ये अगोदर गाण्याचा समावेश नव्हता. पण अरबाजमुळे हा सिनेमा इंटरेस्टींग झालाय’