www.24taas.com,मुंबई
हिट एंड रन प्रकरणी सलमान खानला थोडा दिलासा मिळालाय. या प्रकरणी आज सेशन कोर्टात होणारी सुनावणी टळलीये. आता ही सुनावणी ८ एप्रिलला होणार आहे.
२००२ साली झालेल्या हिट एंड रन प्रकरणी सलमानच्या याचिकेवर सेशन कोर्टात सुनावणी होणार होती. वांद्रे कोर्टाने याप्रकरणी सलमानच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला. वांद्रे कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सलमाननं सेशन कोर्टात अपील केलंय. सदोष मनुष्यवधाचा खटला चालल्यानंतर सलमान दोषी आढळल्यास त्याला १० वर्षाची शिक्षा होऊ शकते.
दबंग खान अर्थात सलमान खान मुंबईत काल परतलाय. पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबई विमानतळावर त्याचं आगमन झालं. अमेरिकेत उपचारासाठी गेलेला सलमान काळवीट शिकारप्रकरणी काल जोधपूर कोर्टात हजर राहू शकला नव्हता. काल जोधपूर कोर्टानं सलमानला तात्पुरता दिलासा दिलाय. वाईल्ड लाईफ प्रोटेक्श कायद्याअंतर्गत हे आरोप लावण्यात आलेत. त्यात अद्याप सलमानवर आरोप निश्चित झालेले नाहीत.