मसाज घेणाऱ्या सचित पाटीलची सुटका

‘झेंडा’फेम अभिनेता सचित पाटीलला गोव्यातील मसाजची क्षणभर विश्रांती चांगलीच भोवली. त्याला गोव्यातल्या एका मसाज पार्लरमध्ये अटक करण्यात आली होती. आज दुपारी त्याला म्हापसा कोर्टात हजर करून त्याची ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 7, 2012, 07:36 PM IST

www.24taas.com, गोवा
‘झेंडा’फेम अभिनेता सचित पाटीलला गोव्यातील मसाजची क्षणभर विश्रांती चांगलीच भोवली. त्याला गोव्यातल्या एका मसाज पार्लरमध्ये अटक करण्यात आली होती. आज दुपारी त्याला म्हापसा कोर्टात हजर करून त्याची ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
गेल्या आठवड्यापासून गोव्यात ठिकठिकाणच्या ब्युटी पार्लरमध्ये गोवा पोलिसांचं धाडसत्र सुरू आहे. पार्लसमध्ये चालत असलेल्या अवैध वेश्या व्यवसायामुळे हे धाडसत्र सुरू असल्याचं समजतंय. त्यातच काल रात्री पर्वरी इथल्या ‘लोटस ब्युटी आणि मसाज पार्लर’मध्ये पोलिसांनी धाड घातली असता पोलिसांना या ठिकाणी अभिनेता सचित पाटील आढळला. यानंतर पोलिसांनी पार्लरवर कारवाई करत सचित पाटील यालाही अटक केली. त्यानंतर काही वेळानंतर सचितला जामीन मंजूर करण्यात आला. अद्याप, सचित या ठिकाणी काय करत होता, हे मात्र कळू शकलेलं नाही.
सचितसोबत आढळलेल्या पाच मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आलीय.