सनी लिऑन सिद्धीविनायक मंदिरात

हिंदी चित्रपट निर्माती एकता कपूरने सांगितलेल्या सल्ला लक्षात घेऊन अमेरिकन पोर्नस्टार सनी लिऑन सिद्धीविनायक मंदिरात गेली. तिने तिथे काकड आरती केली. यावेळी खास व्हिआयपी मंडळी उपस्थित होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 15, 2013, 02:21 PM IST

www.24taas.com, मुंबई
हिंदी चित्रपट निर्माती एकता कपूरने सांगितलेल्या सल्ला लक्षात घेऊन अमेरिकन पोर्नस्टार सनी लिऑन सिद्धीविनायक मंदिरात गेली. तिने तिथे काकड आरती केली. यावेळी खास व्हिआयपी मंडळी उपस्थित होती.
सनीने एकताच्या सगळ्या टीप्स फॉलो केल्यात. पोर्नस्टार ही आपली ओळख पुसण्याचा सनीचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. एकताच्या सांगण्यावरूनच ती देवपुजेला लागली आहे. कोणतेही काम करण्याच्या आधी देवाच्या मंदिरात जाऊन त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे, असा सल्ला एकताने सनीला दिला होता. त्याचे पालन करीत तिने मंदिरात जाणे पसंत केले. दर्शन घेतल्यानंतर ती आपल्या कामाला लागली.
रागिनी एमएमएस - २ या आगामी चित्रपटाच्या यशासाठी चित्रपटाची मुख्य नायिका असलेल्या सनी आणि चित्रपटाची निर्माती एकता कपूर या दोघींनी सिद्धीविनायक मंदिरात काकड आरती केली. यावेळी रागिनी एमएमएस - २ ची स्र्किप्टही सिद्धीविनायक चरणी अर्पण करण्यात आली.
जिस्म - २ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नशिब आजमावणाऱ्या सनीला पहिल्या प्रयत्नात फारसे यश काही मिळाले नाही. मात्र, वादग्रस्त विषय हाताळण्यात हातखंडा असलेल्या एकता कपूरने सनीला जवळ केलेय.