बोल्ड अवतारमध्ये ही दुसरी पूनम....

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम झवर पुन्हा एकदा आपल्या हॉट फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे. तीने आपल्या फॅन्ससाठी एक हॉट फोटोशूट केले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 11, 2013, 04:23 PM IST

www.24taas.com, मुंबई
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम झवर पुन्हा एकदा आपल्या हॉट फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे. तीने आपल्या फॅन्ससाठी एक हॉट फोटोशूट केले आहे.
पूनमने व्हॅलेंटाइन डेसाठी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शूट केले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ पूनमने आपल्या साइटवर अपलोड केले आहे.
मोहरामध्ये ना कजेरे की धार ना मोती के हार या गाण्यात सोज्जळ भूमिका करणारी पूनम झवरने हॉट पोझ देऊन सर्वांना आश्चर्य चकीत केले आहे. तीने हे आपले हॉट फोटो शूट व्हॅलेंटाइन डेला समर्पित केले आहे.

अक्षय कुमारच्या ओ माय गॉडमध्ये संन्यासी बनलेल्या पूनमने आपल्या आदाकारीची छाप सोडली होती. यापूर्वीही तीने सेक्सी लुक्स देऊन ती चर्चेत आली होती.
२ जी घोटाळ्यासंदर्भात एक चित्रपट तयार होत आहे, त्यात ती नीरा राडियाची भूमिका करणार आहे.