सलमानच्या चित्रपटात नरगिसचा आयटम नंबर !

बॉलिवूडची रॉकस्टार गर्ल नरगिस फाखरी `किक` चित्रपटात आपला आयटम नंबरचा तडका दाखवणार आहे. साझिद नाडियाडवाला दिग्दर्शित `किक` चित्रपटात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे.

Updated: Jun 23, 2014, 12:51 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
बॉलिवूडची रॉकस्टार गर्ल नरगिस फाखरी `किक` चित्रपटात आपला आयटम नंबरचा तडका दाखवणार आहे. साझिद नाडियाडवाला दिग्दर्शित `किक` चित्रपटात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे.
सूत्राच्या माहितीनुसार, साझिदला या चित्रपटात एका आयटम नंबर दिग्दर्शित करायचं आहे.
याआधी चर्चा होती की, चित्रपटात दीपिका एक आयटम नंबर करणार आहे, मात्र आता चित्रपटात नरगिस फाखरी आयटम नंबर करणार असल्याची माहिती आहे.
नरगिस या आयटम नंबरसाठी खूप उत्साहित आहे.
नरगिसने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला `फटा पोस्टर निकला हिरो` चित्रपटातही आयटम नंबर केला होता.
किक चित्रपट हा दक्षिण भारतातील एका चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, रणदीप हुड्डा, नवाजद्दिन सिद्दीकी आणि मिथून चकवर्ती यांनी भूमिका केल्या आहेत. ईदच्या दिवशी हा चित्रपटात प्रेशकांच्या भेटीला येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.