‘लंचबॉक्स’ला मिळाला कान्समध्ये पहिला पुरस्कार

सिनेमा दिग्दर्शक रितेश बत्रा यांचा पहिलाच सिनेमा ‘लंचबॉक्स’नं ६६ व्या कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात ‘क्रिटिक्स वीक व्युअर्स चॉईस अवॉर्ड’ पटकावलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 24, 2013, 09:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पॅरिस
सिनेमा दिग्दर्शक रितेश बत्रा यांचा पहिलाच सिनेमा ‘लंचबॉक्स’नं ६६ व्या कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात ‘क्रिटिक्स वीक व्युअर्स चॉईस अवॉर्ड’ पटकावलंय.

अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या या सिनेमात इरफान, नवाजुद्दीन सिद्दिकी, निमरत कौर यांनी भूमिका निभावल्यात. विशेष प्रस्तुती दरम्यान प्रेक्षकांची या सिनेमानं भरपूर वाहवा मिळवलीय.

कान्समध्ये पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अनुराग कश्यप ट्विटरवर म्हटलंय.... ‘लंचबॉक्सनं क्रिटिक्स वीक व्युअर्स चॉईस अवॉर्ड पटकावलंय. याला गोल्डन रेल्वे आणि असंच काहीशा नावानं बोलावलं जातंय’.

‘लंचबॉक्सनं आपले पंख पसरण्यास सुरुवात केलीय. प्रेक्षकांची पसंतीही या सिनेमाला मिळतेय.’ – इरफान खान