कॅट @ ३०

कॅट @ ३०

बॉलिवूडची बार्बीगर्ल म्हणून ओळख असलेली कतरिना आज ३० वर्षांची झालीय. सुंदर अदा आणि दिलखेचक अभिनयाचे तिचे अनेक चाहते आहेत.

Updated: Jul 16, 2013, 05:14 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
बॉलिवूडची बार्बीगर्ल म्हणून ओळख असलेली कतरिना आज ३० वर्षांची झालीय. सुंदर अदा आणि दिलखेचक अभिनयाचे तिचे अनेक चाहते आहेत.
कतरिना गेल्या दहा वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करतेय. या दरम्यान तिने शाहरुख खान, ऋतिक रोशन आणि अक्षय कुमार यांसारख्या बड्या कलाकारामबरोबर तिने काम केलंय. कतरिना सध्या आमिर खानसोबत धूमची सीक्वेल ‘धूम ३’ आणि ऋतिक रोशनसोबत ‘बँग-बँग’मध्ये काम करतेय.
कतरिना आणि अक्षय कुमारची जोडी सगळ्यांची विशेष आवडती आहे. ‘हमको दीवाना कर गए’ आणि ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटांनंतर या जोडीने ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’, ‘दे दना दन’ आणि ‘तीस मार खान’ या चित्रपटातही एकत्र काम केलंय. कतरिनाची सलमानसोबतची जोडी ही हिट ठरली. ‘युवराज’, ‘एक था टायगर’ आणि ‘पार्टनर’ यामध्य़े या दोघांनी काम केलंय.

कतरिनाचा जन्म १६ जुलै १९८४ ला हाँगकाँगमध्ये झाला. तिने १४व्या वर्षीच मॉडेलिंग करायला सुरूवात केली. तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगनेच झाली. मॉडेलिंगच्या हेतूने ती मुंबईत आली होती. याचवेळी तिची ओळख ‘कैजाद गुस्ताद’ यांच्याशी झाली. ‘बूम’ या चित्रपटाने तिने बॉलिवूडमधील करिअरची सुरुवात केली मात्र, हा सिनेमा काही बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही. त्यानंतर मात्र कतरिनाच्या यशाचा आलेख उंचावतच गेलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.