‘दीपिका’ला मागं टाकत ‘कॅट’ ठरली सेक्सिएस्ट वूमन

कतरिना कैफ चौथ्यांदा वर्ल्ड सेक्सिएस्ट एशियन वूमन ठरलीये. गेल्या वर्षभरातून कतरिनाचा एकही चित्रपट झळकला नसला तरी बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीला या वर्षीचा वर्ल्ड सेक्सीएस्ट एशियन वुमनचा मान मिळालाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 5, 2013, 01:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कतरिना कैफ चौथ्यांदा वर्ल्ड सेक्सिएस्ट एशियन वूमन ठरलीये. गेल्या वर्षभरातून कतरिनाचा एकही चित्रपट झळकला नसला तरी बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीला या वर्षीचा वर्ल्ड सेक्सीएस्ट एशियन वुमनचा मान मिळालाय.
कतरिनानं चौथ्यांदा हा मान मिळवलाय. युकेतील इस्टर्न आय या साप्ताहिकाद्वारे याबाबतची मतचाचणी घेण्यात येते. प्रियंका चोप्रा, टिव्हिस्टार द्रष्टी धामी आणि सध्याची बॉक्स ऑफिस क्वीन दीपिका पदुकोणला मागं टाकत कतरिनानं वर्ल्डस् सेक्सिएस्ट एशियन वुमन २०१३च्या ५० प्रसिद्ध महिलांच्या यादीत येणयाचा मान मिळवलाय.
या यादीत प्रियांका चोप्रा दुसऱ्या तर दीपिका चौथ्या स्थानी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.