सैफीनाचं `फाइव्ह स्टार` लग्न

सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी आपल्या लग्नाच्या तयारीबद्दल जरी मौन बाळगलं असलं, तरी त्यांच्या लग्नाला जेमतेम आठवडाच राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची तयारी तर जोरदारच चालू आहे. मोठमोठ्या फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये पाहुण्यांचं बुकिंग होऊ लागलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 10, 2012, 04:01 PM IST

www.24taas.com, मुंबई
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी आपल्या लग्नाच्या तयारीबद्दल जरी मौन बाळगलं असलं, तरी त्यांच्या लग्नाला जेमतेम आठवडाच राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची तयारी तर जोरदारच चालू आहे. मोठमोठ्या फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये पाहुण्यांचं बुकिंग होऊ लागलंय.
गेली पाच वर्षं सैफ आणि करीना यांच्यात प्रेमप्रकरण सुरू आहे. अखेर येत्या १६ तारखेला त्याचं लग्नात रूपांतर होत आहे. हे लग्न शाही थाटात होणार आहे. यासाठी १३ ऑक्टोबरपासून ते १७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बुकिंग केलेलं आहे. येथे सैफ आणि करीनाचे पाहुणे राहातील. तसंच, विवाहपूर्व कार्यक्रमांचे आयोजन या फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये होणार आहे. ज्या हॉटेलमध्ये सैफ अली खानने अनिवासी भारतीय माणसाला मारहाण केली होती, त्या ताज हॉटेलमध्येही पाहुण्यांच्या राहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय जुहूमधील एक फाइव्ह स्टार हॉटेल आणि गुडगांव येथील फाइव्ह स्टारमध्येही पाहुण्यांची सोय करण्यात आली आहे. या सगळ्या तयारीवरून सैफीनाचा विवाहसोहळा किती भव्य आणि खर्चिक असेल, याचा अंदाज येतोय. यापूर्वी लंडनमध्ये सैफ-करीनाचा विवाह समारंभ होणार असल्याची बातमी देण्यात आली होती. मात्र हा विवाह भारतातच होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.