माधुरी सोबत नव्हतं करायचं काम- जुही चावला

अभिनेत्री जुही चावला जी पहिल्यांदाच माधुरी दीक्षित सोबत ‘गुलाब गँग’ चित्रपटात झळकणार आहे. ती म्हणते, की पहिले तिला माधुरी दीक्षितसोबत करायचं नव्हतं आणि भविष्यातही करेल असं वाटत नाही. माधुरी दीक्षित आणि जुही चावला या नव्वदच्या दशकातल्या स्पर्धक अशा अभिनेत्री आहेत आणि त्यांनी कधीही एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 15, 2014, 11:10 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री जुही चावला जी पहिल्यांदाच माधुरी दीक्षित सोबत ‘गुलाब गँग’ चित्रपटात झळकणार आहे. ती म्हणते, की पहिले तिला माधुरी दीक्षितसोबत करायचं नव्हतं आणि भविष्यातही करेल असं वाटत नाही. माधुरी दीक्षित आणि जुही चावला या नव्वदच्या दशकातल्या स्पर्धक अशा अभिनेत्री आहेत आणि त्यांनी कधीही एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं.
‘जतिश्वर’ या बंगाली चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आलेली जुही म्हणते, “मला वाटतं हा (गुलाब गँग) अखेरचा चान्स असेल जेव्हा मी तिच्यासोबत (माधुरी दीक्षित) काम करतेय आणि मला वाटत नाही आम्ही भविष्यात पुन्हा एकत्र काम करु.”
‘गुलाब गँग’ चित्रपटाची पटकथा अतिशय मजबूत आणि उत्तम आहे. त्यामुळंच या दोन्ही दिग्गज अभिनेत्रींना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आयुष्यात अशी घटना एकदाच घडते. आमच्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे.
जुही म्हणते, आमच्यात असलेल्या स्पर्धेमुळंच आजपर्यंत आम्ही एकत्र काम केलं नव्हतं. मला पूर्वी माधुरीसोबत काम करायची संधी मिळाली होती. मात्र आमच्यातल्या स्पर्धेमुळं ते शक्य झालं नाही.
शौमिक सेन दिग्दर्शित अनुभव सिन्हांचा ‘गुलाब गँग’ हा चित्रपट बुंदेलखंड परिसरातल्या महिला कार्यकर्त्यांचा लढा दाखवतो. जुही आणि माधुरी पूर्णपणे विरोधी भूमिकेत या चित्रपटात दिसतील. माधुरी दीक्षित चित्रपटात न्यायासाठी लढते तर जुही राजकीय हितासाठी.
येत्या ७ मार्चला गुलाब गँग रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मार्चला जागतिक महिला दिन आहे. जुही म्हणते, चित्रपटाचं प्रमोशन कधी सुरू होतं याची मी वाट बघतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.