दीपिका पदुकोणचा ‘झिरो फिगर’साठी वेगळाच डाएट

बॉलीवुडच्या तारका आपल्या डाएटसाठी काय काय करतील हे सांगता येत नाही..करीनाने झिरो फिगर केल्यानंतर बॉलीवूडमध्ये बरीच चर्चा झाली होती...आता दीपिका पदुकोणनेही डाएट साठी वेगळाच पर्याय निवडल्याची चर्चा आहे..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 13, 2014, 08:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवुडच्या तारका आपल्या डाएटसाठी काय काय करतील हे सांगता येत नाही..करीनाने झिरो फिगर केल्यानंतर बॉलीवूडमध्ये बरीच चर्चा झाली होती...आता दीपिका पदुकोणनेही डाएट साठी वेगळाच पर्याय निवडल्याची चर्चा आहे..
बॉलीवूडच्या तारका काय करतात? त्यांच डाएट काय असतं यावर सगळ्यांचच लक्ष असतं..कोणी शूटींगचे नियम काटेकोरपणे पाळतो तर कोणी शूटींगच्या धावपळीमध्ये देखील वेळ काढून आपलं डाएट सांभाळतं... आता दीपिका पदूकोणचंच बघूया..
शूटींगच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढत तिने बॅडमिंटनची रॅकेट हातात घ्यायचं ठरवलंय..पिगी चॉप्सने नुकतीच तिला हवी तशी रोल्स रॉईस घेतली तर तिचीच बहीण परिणीतीने जवळपास एक-दीड महिना तिच्या आवडत्या चॉकलेट्स, केक्स कडे बघितलही नसल्याचं कळतंय..
परिणीतीला तिच्या आगामी हसी तो फसी साठी तर दिग्दर्शकाकडूनच वॉर्निंग मिळाली होती..संपूर्ण शूटींगच्या काळात परिणीतीने तिच्या आवडत्या पदार्थांना आळा घालणं गरजेचं होतं..या सिनेमातील काही महत्वाच्या सीनमध्ये परिणीतीला एकदम स्पोर्टी दिसणं गरजेचं होतं...त्यामुळे तिने पिझ्झा, केक खाऊ नये याकडे दिग्दर्शक विनिल यांनीच लक्ष ठेवलं होतं...
तर दुसरीकडे दीपिकाने नव्या वर्षात स्वत:च्या आवडीच्या खेळासाठी वेळ काढायचं ठरवलंय...थोडा तरी मोकळा वेळ काढून लगेचच बॅडमिंटन खेळणार असल्याचं दीपिका सांगतेय...खरं म्हणजे दीपिकाला हा खेळ मनापासून खूप आवडत असल्याने तिलाही ते दुहेरी उपयोगाचंच ठरलंय...आता आपल्या लूक साठी या बॉलीवूड बेब काय करतील हे यावरुन कळतंच असेल...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.