‘टाइमपास’साठी मनसे सरसावली, बनावट सीडींची होळी

बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या टाइमपास सिनेमाच्या पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाचा हिसका दाखवला..फुटपाथवर पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाइमपासच्या पायरेटेड सीडीज ताब्यात घेवून त्याची होळी केली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 13, 2014, 07:33 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या टाइमपास सिनेमाच्या पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाचा हिसका दाखवला..फुटपाथवर पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाइमपासच्या पायरेटेड सीडीज ताब्यात घेवून त्याची होळी केली.
मुंबईच्या खाररोड रेल्वे स्टेशन बाहेर अनेक स्टॉल्सवर अशा सीडीजची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसे चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांनी या स्टॉल्स धारकांना हिसका दाखवला.
बाजारात मोठ्या प्रमाणात टाईमपासच्या पायरेटेड सीडींची विक्री केली जात असल्याचं टाईमपासचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगीतलंय..त्यांनी याप्रकरणी मुंबईचे पोलीस आय़ुक्त सत्यपाल सिंग यांची भेट घेतली..यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शालिनी ठाकरे हे उपस्थित होते

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.