अभिनेता सैफ अली खानविरुद्ध आरोप निश्चित

अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर किल्ला कोर्टात मारहाण प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आला आहे. कलम ३३५ आणि ३४ अंतर्गत ही आरोप निश्चित करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 13, 2014, 06:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर किल्ला कोर्टात मारहाण प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आला आहे. कलम ३३५ आणि ३४ अंतर्गत ही आरोप निश्चित करण्यात आलाय.
२२ फेब्रुवारी २०१२ला सैफ़ अली खान आणि त्याचे दोन मित्र बिलाल आमरोही आणि शकील लड़ाख या तिघांनी ताज हॉटेलमध्ये आलेल्या इक्बाल शर्मा या व्यक्तीला मारहाण केली होती. त्यावेळी करीना कपूर, करिश्मा कपूर आणि मलायका अरोरा, सैफ़ अली खान बरोबर होत्या. त्या प्रकरणाची तक्रार इक्बाल शर्मा यांनी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
या तक्रारीनुसार प्रकरणाचा तपास करुन कुलाबा पोलिसांनी या प्रकरणात आरोप पत्र दाखल केलं होतं आणि त्यानुसार कोर्टानं आज सैफ़ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर आरोप निश्चिती केली. यावेळी सैफ़ अली खान आज कोर्टात हजर राहिला होता. या प्रकरणाची पुढची सुनावणी ३० एप्रिलला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.