अभिनेत्री आलिया भट्टच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या सिनेमातून पदार्पण करणारी बॉलिवूडमधली सगळ्यानाच घायाळ करणारी आलिया भट्टचा आज २०वा वाढदिवस साजरा करण्यात येतो आहे.

Updated: Mar 15, 2013, 06:26 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या सिनेमातून पदार्पण करणारी बॉलिवूडमधली सगळ्यानाच घायाळ करणारी आलिया भट्टचा आज २०वा वाढदिवस साजरा करण्यात येतो आहे. महेश भट्ट यांची आलिया ही छोटी मुलगी आहे. तिने तिच्या पहिल्याच सिनेमातून हम भी किसीसे कम नही हे दाखवून दिलं आहे. आणि बॉलिवूडमध्ये आपले पाय चांगले रोवले. बॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री आणखी काही सिनेमात काम करते आहे. आलियाच्या पहिल्याच सिनेमाच्या दमदार परफॉर्मन्सने खूष होऊन करण जोहरने तिला आगामी सिनेमात देखील घेतले आहे.
आलिया इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये ती सध्या व्यस्त आहे. आणि तिचासोबत प्रमुख अभिनेता म्हणून काम करणार आहे तो म्हणजे रणदिप हुडा. तसेच लेखक चेतन भगत यांची ‘2 स्टेट्स’ या कादंबरीवर आधारित बनणाऱ्या सिनेमातही ती काम करते आहे. ज्यात तिच्यासोबत अर्जुन कपूर असणार आहे.

करण जोहरचा सिनेमा ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ मध्ये आलियाने शनाया सिंघानिया हीचा रोमांटिक रोल चांगलाचा निभावून नेला होता. आणि त्याची बरीच स्तुती देखील झाली होती.