'लगान'च्या भुवनला `फॅण्ड्री`चा जब्या भावला

मिस्टर परफेक्ट आमीर खानने फॅण्ड्री चित्रपट पाहिला आणि त्याला जब्याची भूमिका आवडलीय.

Updated: Mar 5, 2014, 01:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आमीर खानने लगान चित्रपटात गावातल्या भुवनची भूमिका साकारली होती. मिस्टर परफेक्ट आमीर खानने फॅण्ड्री चित्रपट पाहिला आणि त्याला जब्याची भूमिका आवडलीय. हे फॅण्ड्री सिनेमा पाहिला असल्याचं आमीर ट्वीट करून सांगितलंय.
आमीर म्हणतो, आपण नागराज मंजुळेच्या गाजत असेलल्या फॅण्ड्री सिनेमा पाहिला, नागराजने या निमित्ताने सिनेमात यशस्वी पदार्पण केलंय, असं सांगून आमीर नागराजच्या किएटिव्ह टीमचं कौतुक करायला विसरला नाही.
आमीर खानने फॅण्ड्रीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आमीरनेही लगानमध्ये भुवन नावाच्या तरूणाची भूमिका साकारली होती. भूवन हा ही गावचा आणि जब्या हा ही गावातलाच मुलगा आहे.
लगानमधील पात्र ही यापूर्वी सिनेमात काम केलेली होती, त्यांना गावाकडचे डायलॉग बोलण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं. लगान सिनेमासाठी गुजरातमधील भूजमध्ये गाव साकारण्यात आलं.
मात्र नागराज मंजुळेने अस्सल मातीत जगलेलं जब्याचं पात्र निवडलं, संवादही अस्सल गावाकडचे आणि गावंही खरंखुरं.
आमीर खानने आपल्या अनुभवनातून लगानमध्ये भुवन साकारला. मात्र जब्यासाठी हे सर्व काही नवं होतं. तरी नवख्या जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडेला, हे सुरूवातीला अवघड वाटतं असलं, तरी नंतर ते सारं सोप झालं होतं, ते नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनामुळे.
ऑस्करचं नामांकन मिळालेल्या लगानच्या भुवनने फॅण्ड्रीच्या जब्याचं आणि सिनेमाचं कौतुक केलंय, हे सर्वात महत्वाचं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.