कपिलही `कॉमेडी नाईटस्...`च्या बाहेर पडणार?

`कॉमेडी नाइटस् विथ कपिल` या कार्यक्रमातून कॉमेडियन कपिल शर्मा घराघरांत पोहचला. थोड्याच कालावधीत या कार्यक्रमानं प्रेक्षकांची मनं जिंकली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 4, 2014, 09:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`कॉमेडी नाइटस् विथ कपिल` या कार्यक्रमातून कॉमेडियन कपिल शर्मा घराघरांत पोहचला. थोड्याच कालावधीत या कार्यक्रमानं प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला उचलून धरलं. पण, हाच कार्यक्रम आता बंद होण्याच्या तयारीत आहे.
ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल... का? असा प्रश्न तुम्हालाही पडेल... यामागचं कारण म्हणजे, कपिल शर्मानं यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली `बँक चोर` हा सिनेमा हाती घेतलाय. `कॉमेडियन` ते अभिनेता असा प्रवास केलेला कपिल आता बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी तयार आहे.
एका टॅब्लॉईडनं दिलेल्या माहितीनुसार, कपिलनं याअगोदर आठवड्यातून एकदाच हा कार्यक्रम करण्याचा विचार केला होता. परंतु, कलर्सला मात्र हे मान्य नाही. त्यामुळे, या कार्यक्रमातून बाहेर पडून आपला संपूर्ण वेळ आपल्या सिनेमालाच देण्याचा निर्णय कपिलनं घेतलाय.
प्रेक्षकांची संख्या प्रचंड असताना अचानक हा कार्यक्रम बंद करणं कलर्सला महागात पडू शकतं... पण, कपिलच्या नावाचा हा कार्यक्रम कपिलशिवाय कसा चालणार? असाही प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कपिल या कार्यक्रमात राहणार की हा कार्यक्रम बंद होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.