‘व्हॉट द फिश’च्या प्रमोशनसाठी पूनम पांडे सरसावली!

सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि तरुणांना भुरळ घालणारी मॉडेल - अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळचं कारण म्हणजे पूनम आता एका सिनेमाचं प्रमोशन करताना दिसणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा या चित्रपटाशी काहीही संबंध नाही.

Updated: Dec 10, 2013, 09:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि तरुणांना भुरळ घालणारी मॉडेल - अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळचं कारण म्हणजे पूनम आता एका सिनेमाचं प्रमोशन करताना दिसणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा या चित्रपटाशी काहीही संबंध नाही.
चमकलात ना, पूनमचा ज्या चित्रपटाशी काहीही संबंध नसताना ती या चित्रपटाचं प्रमोशन का करणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना! पण, होय. पूनमचा ‘व्हॉट द फिश’ या चित्रपटाशी प्रमोशनव्यतिरिक्त कसलाही संबंध नाही. ‘व्हायकॉम १८’ या चित्रपटनिर्मिती संस्थेनं पूनमला केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरण्याचं ठरवलंय. यासंबंधी तिच्याशी कॉन्ट्रक्टही करण्यात आलंय.
‘व्हायकॉम १८’ निर्मित ‘व्हॉट द फिश’ हा सिनेमा लवकरच पडद्यावर झळकणार आहे. १० डिसेंबरपासून या चित्रपटाचं प्रमोशन सुरू होणार आहे. त्यावेळी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत पूनमही प्रसिद्धी करताना दिसेल, असं सांगण्यात येतंय.
बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता त्या चित्रपटाच्या कलाकारांव्यतिरीक्त दुसऱ्या सेलिब्रिटीला बोलावण्याचा ट्रेन्ड यानिमित्तानं पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला जास्त प्रमाणात प्रसिद्धी मिळावी याकरिता पूनम पांडेला आमंत्रित केले जात असल्याचे चर्चा होताना दिसतेय. लवकरच पूनम ‘व्हायकॉम १८’ सोबत चित्रपट करतानाही दिसणार आहे, अशीही चर्चा आहे. त्यामुळेच `व्हॉट द फिश` च्या प्रमोशनसाठी पूनम येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ