www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुलाब गँग हा एका सत्य घटनेवर आधारलेला चित्रपट आहे. ऍक्शनने आणि मारधाडीने ओथंबून वाहणारा हा चित्रपट विशेष करून महिला प्रधान आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल की नाही याची शंका आहे, पण जुही चावलाने वढवलेली भूमिका तुमचे लक्ष्य वेधण्यात यशस्वी ठरते. गुलाब गँग अनेक धारणांना छेद देणारा आहे. हा चित्रपट संपत पाल यांच्या जीवनावर आधारीत आहे. महिलांसाठी पाल यांनी गुलाब गँगची निर्मिती केली. आता ही काहणी चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे.
हा चित्रपट महिला आणि तरुणींना आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. गुलाब गँगचा उद्देश केवळ महिलांना आत्मनिर्भर बनविणे हाच नसून राजकारण आणि जनतेमध्ये सुरू असलेल्या घाणेरड्या खेळाचे यथार्थ चित्रण यात करण्यात आले आहे.
महिला प्रधान या चित्रपटाच्या नायिका काठ्या, खंजीर आणि भाले चालवतांना दिसल्या आहेत. तसेच आपल्या शूत्रांना छोबीपछाड देतानाही दिसतात. दिग्दर्शक सौमिक सेन यांनी चित्रपटावर आपली पकडही बनवून ठेवली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला जे हवे ते योग्यरित्या मांडले आहे.
काय आहे काहणी
उत्तर भारतातील माधवपूर या गावात रज्जो देवी (माधुरी दीक्षित) महिला आश्रम चालवत असतात. या महिला आश्रमात गुलाबी साड्या तयार करण्याचे काम करतात आणि त्याही गुलाबी साड्याच परिधान करतात. गावात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात ही गँग कंबर करसली आहे.
या महिला जशाच तसे उत्तर देण्याचा दमखम ठेवतात. आश्रमात रज्जो देवीच्या स्वप्नातील एक नर्सरी आहे. या नर्सरीत महिला आणि लहान मुलींना आपल्या पायावर उभे करण्याची तिची इच्छा असते. गावात एक शाळा सुरू करण्याची तिची मनीषा असते. पण गुलाब गँगच्या समोरही एक मोठे आव्हान आहे. गावातील नेता पवन शंकर आणि त्याची साथीदार सुमित्रा देवी (जुही चावला) हे यातील मोठे अडसर आहेत. सुमित्रा देवी खूपच धूर्त आहेत. रज्जोची लोकप्रियता सुमित्रा देवीला हलवून सोडते आणि त्यानंतर काय होते हे चित्रपटगृहात पाहणे योग्य ठरेल.
कसा झाला अभिनय
माधुरी आणि जुही चित्रपटाचा आत्मा आहेत. चित्रपटात चांगले संवाद आहेत. जुही चावलाने गुलाब गँगमध्ये एका राजकारण्याची भूमिका निभावली आहे. त्यात जानही टाकली आहे. माधुरीनेही प्रयत्न केला आहे पण जुही यात तिच्यावर भारी पडली आहे. गुलाब गँगमधील सदस्यांमध्ये झालेले वाद, मस्ती आणि इतर दृश्य मजेदार आहेत. चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळणार नाही. पण सामाजिक संदेश देण्यास हा चित्रपट खरा ठरला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.