रेल्वेची मागच्या दाराने भाडेवाढ... प्रवाशांना ठेंगा

आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी रेल्वे बजेट आज जाहीर करण्यात आला. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज रेल्वे बजेट लोकसभेत सादर केला.

Updated: Feb 26, 2013, 02:23 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी रेल्वे बजेट आज जाहीर करण्यात आला. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज रेल्वे बजेट लोकसभेत सादर केला. कोणत्याही प्रकारची प्रवाशी भाडेवाढ केली नसली, तरी भाडेवाढीची गरज असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रवासी भाडेवाढ न करता रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना दिलासा दिला असे वाटत असताना, रेल्वे अधिभार महागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मागाच्या दाराने का होईना, पण रेल्वे तिकीट दरात वाढ होणार असल्याचे समजते. तर त्यासोबत माल वाहतूक दरवाढही करण्यात आली आहे.
त्याचसोबत दरवर्षी ५ ते ६ टक्क्यांनी प्रवाशी भाडेवाढ करण्याचे संकेतही रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काही दिवसांनी प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

LIVE : रेल्वे अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे...
> दुपारी १.२६ : संसदेची कार्यवाही स्थगित
> दुपारी १.२० मिनिट : छुपी रेल्वे भाडेवाढ करण्याचे रेल्वेमंत्र्यांचं संकेत... विरोधकांचा गोंधळ... गोंधळातच रेल्वेमंत्र्यांचं भाषण सुरू
> पंढरपूर - मंगळवेढा - विजापूर नवीन रेल्वे गाडी
> परभणी - मनमाड दरम्यान नवीन गाडी
> कल्याण- कर्जतमध्ये तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव
> ६७ नव्या एक्सप्रेस ट्रेन... तर २६ नव्या पॅसेंजर ट्रेन
> पाच मेमू आणि आठ डेमू ट्रेन सुरु करणार
> सुपरफास्ट आणि तात्काळ तिकीट दरांत वाढ
> आरक्षण आणि रद्दीकरण शूल्‍क वाढणार
> मुंबईत लोकलच्या अतिरक्त ७२ फेऱ्या
> मुंबईकरांसाठी खुशखबर : मुंबईत आणि कोलकातामध्ये वर्षभरात एसी लोकल धावणार
> बजेटमध्ये रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ नाही ( प्रवाशांना दिलासा)
> प्रवासी भाड्यातून ३२,५०० कोटी नफ्याचं लक्ष
> जम्मूच्या कटारापर्यंत रेल्वे जाणार
> २०११-१२ मध्‍ये रेल्‍वेनं घेतलेलं तीन हजार कोटींचं कर्ज व्याजासहित फेडण्यात आलं
> राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना प्रथम श्रेणी एसीचा पास
> सध्या स्वातंत्र्यसैनिकांना दरवर्षी त्यांचा पास रिन्यू करावा लागतो, आता तो तीन वर्षांनी रिन्यू करावा लागेल
> रायबरेलीत रेल्वेचा आणखी एक कारखाना उभारणार
> नागपुरमध्ये मोठे प्रशिक्षण केंद्र उभारणार
> मंदीमुळे मालवाहतुकीचं उद्दीष्ट गाठण्यात अपयश
> जुनं सामान विकून रेल्वे उभे करणार ४५०० करोड रुपये (विरोधकांचा गोंधळ)
> `पैसा कमाना ही पैसा बचाना है`
> रेल्‍वेतील दीड लाख पदे भरण्‍यासाठी ६० शहरांमध्‍ये परीक्षा होणार
> एक लाख ५२ हजार पदं भरणार, अपंगांना आरक्षण मिळणार
> राज्‍य सरकारांच्‍या भागीदारीत फुट-ओव्‍हर ब्रिज बनवण्‍याचा विचार (विरोधकांचा गोंधळ)
> पाटणा, आग्रा, नागपूर, बंगळुरू, विशाखापट्टनम येथे राहण्‍याची अत्‍याधुनिक सुविधा देण्‍यासाठी लाऊंज उभारणार
> अरुणाचल प्रदेश प्रथमच रेल्वेच्या जाळ्यात
> विद्यार्थ्यांसाठी `आझादी एक्सप्रेस`
> नागपूरमध्ये `नीर` प्रकल्प उभारणार
> सर्व स्टेशन्सवर इलेक्ट्रॉनिक डिसप्ले बसवणार
> तिकीट विक्री प्रकिया पारदर्शक करणार
> रेल्वेतील खाद्यपदार्थांचे परिक्षण होणार
> सर्व रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देणार
> रात्री ११.३० ते १२.३० रेल्वे ऑनलाईन तिकिट विक्रि बंद राहणार
> मोबाईलच्या माध्यमातून रेल्वे तिकिट बुकिंग
> १०४ स्टेशन्सवर स्वच्छतेच्या विशेष सुविधा राबवणार
> ४०० स्टेशन्सवर लिफ्ट सुविधा मिळणार
> अपंग प्रवाशांसाठी रेल्वेत विशेष सुविधा राबवणार
> नंदन निलकेणी यांच्यासोबत आधारकार्ड रेल्वे सुविधांशी संलग्न करण्यासाठी केली चर्चा
> रेल्वे सुविधांसाठी `आधारकार्डा`चा वापर करण्याविषयी विचार सुरू
> `आरपीएफ`मध्ये महिलांना १० टक्के आरक्षण
> `सिर्फ हंगाम खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशिश है की सुरत बदलनी चाहिए`
> रेल्वेमध्ये महिलांच्या सुरक्षेत वाढ; महिलांच्या सुरक्षेसाठी स्पेशल आठ स्वतंत्र बटालियन स्थापणार
> रेल्वे मार्गावर प्राण्यांची होणारे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न
> सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणेत सुधारणेची गरज
> अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रेल्वेनं राबविले अनेक योजना
> गेल्या वर्षात रेल्वे अपघातांचं प्रमाण कमी झालंय
> सुविधा वाढवल्या म्हणून झाली भाडेवाढ
> रेल्वे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं
> रेल्वे विकासाचं प्रभावी माध्यम
> रेल्वेची प्